सिंदेवाही येथे श्री संत गाडगेबाबा जयंती संपन्न.

सिंदेवाही येथे श्री संत गाडगेबाबा जयंती संपन्न.

सिंदेवाही येथील श्री राम मंदिरात श्री. संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून सकाळी ८ वाजता पुरुष व महिला पदाधिकारी व समाज बांधव महिला भगिनींनी प्रभात फेरी (दिंडी) काढली. यात मोठ्या संख्येने समाज बांधव महिला भगिनी युवक युवती व बालगोपाल सहभागी झाले. त्यानंतर डी. डी. सोनटक्के साहेब संस्थापक प्रदेशाध्यक्ष, भेय्याजी रोहणकर जेष्ठ मार्गदर्शक व प्रदेश उपाध्यक्ष, अशोकराव क्षिरसागर प्रदेश सचिव,प्राचार्य भारत मेश्राम शिक्षणतज्ञ सिंदेवाही विजय रामटेके सर सिंदेवाही उज्वलाताई कामरकर महिला प्रदेश महासचिव छायाताई ज्ञानेश्वरजी भोस्कर नगरसेविका माजी नगराध्यक्षा हिंगना जिल्हा नागपूर नागपूर जिल्हा ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा, सीमा सहारे सिंदेवाही यांचे हस्ते दिपप्रज्वलन होऊन श्री. संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला माल्यार्पन करण्यात आले.

पाहुण्यांचे स्वागत स्वागत गिताने झाले. सर्व पाहूण्यांनी श्री. संत गाडगेबाबांच्या जीवनावर आधारित व समाज संघटनेच्या माध्यमातून झालेल्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून उपस्थित समाज बांधवांना दिली. सेवानिवृत्त प्राचार्य हरीभाऊ पाथोडे यांनी श्री. संत गाडगेबाबांच्या कार्याची महती प्रखरपणे मांडली.

डी. डी. सोनटक्के यांच्या विनंतीवरून चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भा.ज.पा., अशोक नेते खासदार, देवरावजी भोंगळे भा.ज.पा.चंद्रपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण), अतुल देशकर माजी आमदार, स्वप्नील कावळे यांनीसुद्धा जयंती कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली व समाज बांधवांना उचीत मार्गदर्शन करून संबोधित केले.

दिवकरजी बारसागडे आकाशवाणी कलाकार यांनी भजन मंडळात सहभागी होऊन उत्तम गायनाचा आविष्कार सादर केला.

सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुला मुलींचे नृत्य व गायनाने कार्यक्रमाला रंगत आणली. गोपाल काला महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्रमोद सुरनकर, दिपक खामनकर, गुलाब भोस्कर, सोनू पातूरकर, रितेश अष्टकार, रजनीताई अष्टकार,मनिषा खामनकर, प्रतिभा सुरनकर, व सर्व पुरुष व महिला पदाधिकारी व सिंदेवाही तालुक्यातील शिवनी नवरगाव गडबोरी भेंडाळा पळसगाव टेकरी तांबेगडी मेंढा व पेटगाव ईतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.