मच्छिपालन सोसायटीच्या वतीने प्रशिक्षण कार्यशाळा सपन्न

मच्छिपालन सोसायटीच्या वतीने प्रशिक्षण कार्यशाळा सपन्न

सिंदेवाही पंचशील मच्छिपालन सोसायटी सिंदेवाही व प्राध्यापक डॉ राजेश डहारे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदेवाही तालुक्यातील मच्छिपालन सोसायटी च्या सभासदासाठी एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सचीवाची कार्यपद्धती या विषयावर हे प्रशिक्षण घेण्यात आले. हे प्रशिक्षण श्रि गुलाबराव भानारकर नागभीड यांनी घेतले यामध्ये कॅशबुक कसे रहावे नफा तोटा पत्रक व ताळेबंद व सहकार नियमावली या विषयावर माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ राजेश डहारे सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही यांनी केले व उपस्थितांना संस्थेचे कामकाज समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे असे नमूद केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुखरुजी मारबते सचिव पंचशील मच्छिपालन सोसायटी सिंदेवाही हे होते व त्यांनी सचिवांनी सर्व संचालक व सदस्यांना घेऊन चालावे असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून यादवराव मेश्राम पेंढरी यांनी येणाऱ्या अडचणी वर मात कशी करावी याबद्दल माहिती दिली. श्रीमती मिनाक्षी मेश्राम नगरपंचायत सदस्या यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरूषोत्तम भोयर यांनी व आभार अरविंद मेश्राम यांनी मानले. प्रशिक्षण कार्यक्रमात सौ उमा डहारे व इतर सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले