सीडीएस परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण Ø महाराष्ट्रातील युवक-युवतींना 1 फेब्रुवारी ते 9 एप्रिल कालावधीत मिळणार प्रशिक्षण

सीडीएस परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण

Ø महाराष्ट्रातील युवक-युवतींना 1 फेब्रुवारी ते 9 एप्रिल कालावधीत मिळणार प्रशिक्षण

 

चंद्रपूर, दि. 01 : कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (सीडीएस) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील स्थायी युवक-युवतींसाठी दि. 1 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2023 या कालावधीत कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (सीडीएस) कोर्स क्रमांक 60 प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथील प्रभारी अधिकारी यांच्या 0253-2451032 व 09130271626 दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असे चंद्रपूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.