गडचिरोली | शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीकरीता शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा

शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीकरीता शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा

गडचिरोली, दि.09: भारत निवडणूक आयोगाने दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्धीपत्रकान्वये नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणूकीचा दिनांक 30 जानेवारी (सोमवार) रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 पर्यंत असून मतमोजणी दिनांक 2 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी होणार आहे.

या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा शासन निर्णयानुसार मिळणार आहे. सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे असे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (सा.प्र.) विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर यांनी कळविले आहे.