chandrapur I आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपुरातील व्यापाऱ्यांचे होणार लसीकरण…

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपुरातील व्यापाऱ्यांचे होणार लसीकरण…

जिल्ह्यातील लॉकडाऊन संपले असताना संपूर्ण बाजारपेठ खुली झाली आहे. अश्या स्थितीत व्यापारी बंधू “सुपर स्प्रेडर” ठरू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. महानगरात या व्यापाऱ्यासाठी दोन स्वतंत्र केंन्द्राची व्यवस्था करावी अश्या सूचना लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवार (१० जुन) ला जिल्‍हाधिका-यांना केल्‍या आहेत. यामुळे व्‍यापारी व त्‍यांच्‍या परिवारातील सदस्‍यांच्‍या लसीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

कोरोनाशी लढा देण्‍यासाठी लसीकरण ही काळाची गरज झाली आहे. लसीकरणाचे विविध टप्‍पे सुरू असताना मध्‍यंतरी या प्रक्रियेमध्‍ये व्‍यत्‍यय निर्माण झाला होता, परंतु आता मोठया प्रमाणावर कोरोना लस उपलब्‍ध झाली आहे. लॉकडाऊन संपल्‍यामुळे पुन्‍हा कोरोनाचा संसर्ग बाजारपेठेतुन होवू शकतो. अशा स्थितीत व्‍यापारी बंधूंचे लसीकरण करणे आवश्‍यक आहे. हे लसीकरण यथाशिघ्र करण्‍यात यावे यासंदर्भातील निवेदन फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अॅन्‍ड इंडस्‍ट्रीजतर्फे आ. मुनगंटीवार यांना प्राप्‍त झाल्‍यानंतर त्यांनी जिल्‍हाधिका-यांची प्रत्‍यक्ष भेट घेवून हा प्रश्‍न मार्गी लावला. याचवेळी त्‍यांनी व्‍यापा-यांसाठी दोन स्‍वतंत्र केंद्र उपलब्‍ध करून द्याव्‍या अशाही सुचना केल्‍या. यावेळी फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अॅन्‍ड इंडस्‍ट्रीजचे अध्‍यक्ष रामकिशोर सारडा व माजी अध्‍यक्ष संतोष चिल्‍लरवार, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.