Chandrapur I चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही आरमोरी रोडवर लग्नांच वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक पटल्याने भिषन अपघात.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही आरमोरी रोडवर लग्नांच वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक पटल्याने भिषन अपघात.

प्रतिनिधी अमान पटेल – ९७६७२८३०४३

२५/०२/२०२१

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा वाहन चालक दारूच्या नशेत असल्याने वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने ट्रक पटल्यामुळे मोठा अपघात झाला. असुन घटनास्थळावरुन वाहन चालक फरार.

अपघतात ४ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये २ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.
अपघातात १५ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत. त्यात ८- पुरुष ५-महीला १- मुलगा १- मुलगीचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक योगेश घारे, तहसिलदार गणेश जगदाळे, घटनास्थळी दाखल झाले.
सर्व जखमिंना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे शिव प्रतिष्ठान च्या युवकांच्या मदतिने दाखल करण्यात आले.
रुग्णांना प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे हलविण्यात आले.