Home Breaking News …या पतसंस्थेबाबत काही हरकती असल्यास 12 नोव्हेंबरपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन

…या पतसंस्थेबाबत काही हरकती असल्यास 12 नोव्हेंबरपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन

…या पतसंस्थेबाबत काही हरकती असल्यास 12 नोव्हेंबरपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 04 : नितीका गोल्डन अर्बन क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चंद्रपूर या सहकारी संस्थेचा नोंदणी प्रस्ताव सहायक निबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर कार्यालयाला प्राप्त झाला आहे. या संस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास या कार्यालयात 12 नोव्हेंबर 2026 पूर्वी सादर कराव्यात किंवा 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता या कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली असून सुनावणीचे वेळी सदर हरकती दाखल कराव्यात.

विहित मुदतीत हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न राहिल्यास संबंधित सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधाने काहीही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी, असे सहायक निबंधक एस.एस. तुपट यांनी कळविले आहे.