नागभीड पोलीसांनी कान्पा परीसरात पकडला गांजा 

नागभीड पोलीसांनी कान्पा परीसरात पकडला गांजा 

दिनाक 09.11.2025 रोजी गोपनिय माहीती मिळाली की, आरोपी नामे रक्षद प्रभाकर आत्राम वय 23 वर्षे, जात-गोंड, रा. आदिवाशी मोहल्ला वार्ड नं. 3 कान्पा ता. नागभीड याने त्याचे घराचे अंगणात गांजा (अंमली पदार्थ) ची झाडे लावलेली आहेत. अशा माहीतीवरून पोस्टाफ सह मौजा कान्पा येथे पोहचुन दोन शासकीय पंचासमक्ष रक्षद प्रभाकर आत्राम वय 23 वर्षे, जात-गोंड, रा. आदिवाशी मोहल्ला वार्ड नं. 3 कान्पा ता. नागभीड यास ताब्यात घेऊन त्याचे राहते घराचे आजुबाजुचे परीसराची पाहणी केली असता त्याचे घराचे अंगणात गांजा या अंमली वनस्पतीचे लहान-मोठे 47 झाडे एकुण वजन 23 किलो 910 ग्रॅम प्रति किलो 10,000/- रूपये प्रमाणे 2,39,100/- रूपयेचा गांजा अवैध विक्री करीता लागवड करून संगोपन करीत असताना मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल आरोपीसह ताब्यात घेऊन पो.स्टे. नागभीड अप क्र. 381/2025 कलम 8 (क), 20(ब) (ii) (क) एन.डी.पि.एस अॅक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. श्री. मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक, मा. श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. राकेश जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक पो.स्टे. नागभीड यांचे नेतृत्वात सपोनि दिलीप पोटभरे, पोउपनि अजिंक्य गोविदलवार, भोजराम लांजेवार, पोहवा दिपक कोडापे, पो. अं भरत घोळवे, दिलीप चौधरी, प्रफुल रोहनकर, विक्रम आत्राम, ज्ञानेश्वर कुंभारे, आकश चोपकर, मपोअं. किरण कोकोडे, अरूणा धुर्वे यांचे पथकाने केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि किशोरकुमार वैरागडे पो.स्टे. नागभीड हे करीत आहे.