पोहायला गेलेले अनिकेतचा नदीत बुडून मृत्यू . तिनं मित्र सुखरूप…
रत्नापुर दि. 07 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारास रत्नापुर गावात एक दुर्दैवी घटना घडली. गावातील अनिकेत अनिल पर्वते (वय 18) हा तरुण अभ्यासासाठी घरातून बाहेर पडला होता. त्याने आपल्या वडिलांना सांगितले होते की तो महात्मा फुले अध्ययनिकेत, रत्नापुर येथे आपल्या मित्रांसोबत अभ्यासासाठी जात आहे.
मात्र काही वेळाने गावातील पोलीस पाटील यांनी कुटुंबियांना कळविले की अनिकेत उमा नदीच्या पात्रात बुडाला आहे. ही माहिती मिळताच अनिकेतचा काका सदानंद राजीराम पर्वते व वडील अनिल राजीराम पर्वते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अनिकेतला नदीबाहेर काढले आणि सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेत मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांनी सांगितले की अनिकेतचा मृत्यू हा अपघाती असून, त्यामागे कोणताही संशयास्पद प्रकार नाही. या घटनेमुळे रत्नापुर व परिसरात शोककळा पसरली आहे.










