डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी तात्काळ अर्ज नोंदणी करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी तात्काळ अर्ज नोंदणी करा

चंद्रपूर, दि. 30 : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील 11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले, सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https//hmas mahait.org या पोर्टल वर ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे.

स्वाधार योजनेचे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यातील स्वाधार योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांनी https//hmas-mahait.org या पोर्टलवर लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावे. तसेच सदर अर्जाची प्रत संपूर्ण कागदपत्रासह कार्यालयामध्ये सादर करावी. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.