सिंदेवाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव रविवारला
हिंदू संस्कृतीतील पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक असलेला विजयादशमी उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सिंदेवाही येथे रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वाजता श्री सोमेश्वर महाराज देवस्थान पटांगण येथे साजरा होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. भास्करजी श्रावण नन्नावार, नगराध्यक्ष नगर पंचायत सिंदेवाही (लोनवाही) तर प्रमुख वक्ते मा. आल्हादजी शिनखेडे, ब्रह्मपुरी जिल्हा सहकार्यवाह असतील. सायं. ५ वाजता श्री सोमेश्वर देवस्थान येथून भव्य पथसंचलन निघेल.
या उत्सवाचे आयोजन प्रदीपजी चावरे, शाखा कार्यवाह आणि मनोहरराव पर्वते, मा. सहसंघचालक सिंदेवाही तालुका (रा.स्व.संघ) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. नागरिकांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.