“ पत्रकारानेच घातला जिल्हयात अनेक ठिकाणी महीलांना आर्थिक गंडा”

“ पत्रकारानेच घातला जिल्हयात अनेक ठिकाणी महीलांना आर्थिक गंडा”

दिनाक 07.10.2025 रोजी पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रारदार नामे सौ. भारती फुलचंद फाले वय 34 वर्षे रा. कान्पा यांनी तक्रार दिली की, आरोपी नामे राजेंद्र विनोद मेश्राम वय 39 वर्षे रा. जामगाव (बु) ता. वरोरा जि. चंद्रपुर याने स्वयंभु सनराईज ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था, चंद्रपुर या संस्थेव्दारे गावागावात माय इंडीया निधी बँकेची शाखा स्थापन करून त्या शाखेमध्ये फिर्यादीला एरीया मॅनेजर पदावर म्हणुन नोकरी देतो तसेच इतर महीलांना सुध्दा त्या संस्थेत नोकरी देतो, असे सांगुन विश्वास संपादन केला व खोटी ऑर्डर तयार करून ती खरी असल्याचे भासवुन फिर्यादी तसेच इतर महीलांची एकुण 5,30,000/- रूपयेची फसवणुक केली. अशा तोंडी तक्रारीवरून पो.स्टे. नागभीड येथे अप क्रं.350/2025 कलम 420,467,468,471 भा.दं.वि. अन्वये नोंद आहे.

सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी स.पो.नी. दिलीप पोटभरे यांनी पोलीस निरीक्षक श्रीः रमाकांत कोकाटे पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनात आरोपी नामे राजेंद्र विनोद मेश्राम वय 39 वर्षे रा. जामगाव (बु) ता. वरोरा जि. चंद्रपुर याला ताब्यात घेऊन दि.08.10.2025 रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी हा दैनिक कळमनगरी जिल्हा चंद्रपुर प्रतिनिधी म्हणुन काम करीत असल्याचे सांगत असुन त्याचा इतिहास पाहीला असता त्याचेवर चंद्रपुर जिल्हयात अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे नोंद आहेत.

सदरची कामगिरी मा.पो.अ.श्री. मम्मुका सुदर्शन सा., मा.अ.पो.अ.श्री. ईश्वर कातकडे सा., मा. उप.वि.पो. अधि. श्री. राकेश जाधव सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. रमाकांत कोकाटे पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनात दिलीप पोटभरे, पो.हवा. दिपक कोडापे, पो.अं. दिलीप चौधरी यांनी पार पाडली आहे.स.पो.मि.