जबरीचोरीचा गुन्हा दाखल होताच, अवध्या चार तासात आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हा उघड

जबरीचोरीचा गुन्हा दाखल होताच, अवध्या चार तासात आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हा उघड

गुन्हयातील रोख ४२३००/- व दुचाकी असा एकुण १,१२,३००/- रु. चा माल जप्त

पोलीस स्टेशन राजुरा ची कारवाई

दिनांक २४/०९/२०२५ चे रात्रौ २१:३० ते २१:५० वा. सुमारास यातील फिर्यादी नामे श्री हंसराज किसनराव दिघाडे वय ५५ वर्ष रा. तुकूम चंद्रपूर हा मौजा गडचांदुर येथुन मार्केटिंग चे रोख रक्कम घेवुन चारचाकी वाहन टाटा एन्ट्रॉ वाहनाने ड्रायव्हर सोबत राजुरा हायवे रोडने येत असतांना ३ अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीची गाडी थांबवून लोखंडी रॉडने धमकावुन फिर्यादीजवळुन एकुण ९३,०००/- रु. रोख जबरीने घेवुन पळुन गेले. अशा फिर्यादीने २८/०९/२०२५ रोजी दिलेल्या रिपोर्टवरुन पोस्टे राजुरा येथे अपराध क्रमांक ४७०/२०२५ कलम ३०९ (४), १२६ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर गुन्हयाचे तपासात फिर्यादी सोबत असलेल्या वाहन चालकास संशयावरुन ताब्यात घेवुन त्याचे कडे सखोल विचारपुस केली असता त्याने त्याचे तीन साथीदारासह कट रचुन सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्हयात आरोपी नामे (१) सौरभ देविदास निलेवार वय २३ वर्ष, (२) जाकीर सादीक शेख वय २५ वर्ष, (३) अरबाज जाकीर शेख वय २४ वर्ष, (४) मुजाहिद आव्हद शेख वय २६ वर्ष सर्व रा. चंद्रपूर यांना गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयातील जबरी चोरी केलेल्या रक्कमेपैकी रोख ४२,३००/- रु. आणि गुन्हयात वापरलेली दुचाकी वाहन किं. ७०,०००/- रु. असा एकुण १,१२,३००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार राजुरा पोनि श्री सुमीत परतेकी यांचे नेतृत्वात सपोनि श्री हेमंत पवार, पोउपनि श्री दिपक ठाकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, महेश बोलगोडवार, शफीक शेख, आंनद मोरे, बालाजी यामजवार, शरद राठोड, राजु दुबे सर्व पोस्टे राजुरा यांनी केली आहे.