चंद्रपूर शहरातील देवी विसर्जन करण्यासाठी इरई नदीच असणार अधिकृत स्थळ
चंद्रपूर 25 सप्टेंबर – शहरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या देवी विसर्जन सोहळ्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे तयारी केली जात असुन इरई नदी हेच विसर्जनाचे अधिकृत स्थळ असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. .
विसर्जन सुरळीत पार पडावे यादृष्टीने मनपाची शहर नियंत्रण समिती कार्यरत असुन मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन स्थळावर सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत. विद्युत विभागामार्फत मार्गावर तसेच विसर्जन स्थळावर पुरेशी लाईट व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाची चमु वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार असुन अँब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात येत आहे.
यांत्रिकी विभागामार्फत वाहन व्यवस्था सांभाळण्यात येत असुन विसर्जन स्थळी लागणारे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय कार्यरत ठेवण्यात येणार आहे.अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन विसर्जनप्रसंगी आवश्यक त्या साधने उपलब्ध केली गेली आहेत. स्वच्छता विभागाद्वारे रस्त्यांची नियमित सफाई करण्यात येत असुन रस्त्यावर व विसर्जन स्थळी कचरा जमा राहु नये यादृष्टीने घनकचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. ईरई नदी या मुख्य विसर्जन स्थळाची स्वच्छता केली गेली आह. विसर्जनानंतर त्याच रात्री सर्व रस्ते स्वच्छ करून सकाळी सर्वांना स्वच्छ रस्त्याचा वापर मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी मिळतो.
नवरात्रात लागणाऱ्या विविध परवानग्या या मनपाने सुरु केलेल्या एक खिडकी योजनेद्वारे देण्यात आल्या आहेत. यंदा 229 मंडळांनी परवानगीसाठी अर्ज ऑनलाईन अर्ज सादर केला होता. महानगरपालिकेद्वारे ही सर्व कार्ये दरवर्षी पार पाडली जातात. यावर्षीसुद्धा देवी विसर्जन सोहळा हा शांततेत व आनंदात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.