स्वच्छतेचे विचार सर्वांमध्ये रुजवा – मच्छिंद्रनाथ धस

स्वच्छतेचे विचार सर्वांमध्ये रुजवा – मच्छिंद्रनाथ धस

चंद्रपूर दिनांक 25 सप्टेंबर 2025 – स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवाडा द्वारा विविध उपक्रम राबविल्या जात असून, नुकताच चंद्रपूर तालुक्यातील जुनोना या गावी एक दिवस एक तास एक साथ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शाश्वत स्वच्छता गाव स्तरावर निर्माण करायची असल्यास , स्वच्छतेचे विचार सर्वांमध्ये रुजवण्याची गरज आहे . असे मत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक मच्छिंद्रनाथ धस यांनी व्यक्त केले आहे.

जुनोना या गावात शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रकल्प संचालक जल जीवन मिशन मच्छिंद्रनाथ धस, गटविकास अधिकारी चंद्रपूर संगीता भांगरे ,सहाय्यक गटविकास अधिकारी धनंजय पाल ,प्रकल्प अधिकारी बालकल्याण आरती जगताप, गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्ताविक जुनोना ग्रामपंचायतचे सरपंच विवेक शेंडे यांनी केले. यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून पुढे बोलताना म्हणाले की, शाश्वत स्वच्छता राखणे काळाची गरज असून, स्वच्छता बालपणापासून रुजवणे तितकेच गरजेचे आहे. याकरिता अंगणवाडी सेविका शिक्षिका व घरातील आई-वडिलांनी याबाबत जागृत राहायला पाहिजे . तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रत्येक घरात स्वच्छता राखल्या जाईल. यातून परिसर स्वच्छ होईल. गटविकास अधिकारी संगीता भांगरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून , स्वच्छतेवर चर्चा केली यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छतेची प्रत्येक सवय महत्त्वाची असून आपण अंगवळणी लावली पाहिजे . असे मत यावेळी व्यक्त केले. गावाच्या परिसरात वृक्षारोपण करून, उपस्थित सर्वांना सार्वजनिक स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाला स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ञ कृष्णकांत खानझोडे ,प्रवीण खंडारे ,साजिद निजामी, प्रकाश उमक, बंडू हिरवे ,तृशांत शेंडे, गितेश गुप्ता, मनोज डोंगरे जुनोना गावचे उपसरपंच किशोर कोडापे, ग्रामसेवक दिलीप रामटेके, विस्तार अधिकारी पंचायत विजय यारेवार, गटसमन्वयक आर्शिया शेख, किसन आक्कुलवार व गावातील गणमान्य नागरिक विद्यार्थी , शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ज्योती लहानगे यांनी केले ,तर आभार विस्तार अधिकारी पंचायत मीनाक्षी बनसोड यांनी केले.