नामदेव कापसे, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र आधिकारी यांच्या पुस्तकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याचे हस्ते प्रकाशन 

नामदेव कापसे, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र आधिकारी यांच्या पुस्तकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याचे हस्ते प्रकाशन 

सिंदेवाही येथील सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी नामदेव कापसे यांच्या दोन पुस्तकाचे प्रकाशन निरनिराळ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री डॉ अशोकजी उईके ह्याचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सिंदेवाही येथील राहिवासी असलेले नामदेव पुंडलिक कापसे हे वनविभाग मध्ये ३३ वर्षेची सेवा करुन निवृत्त झाले. 33 वर्षे सेवेत प्रशिक्षणाच्या माध्यमातुन चंद्रपूर वनप्रबोधिनी, जालना, चिखलदरा, साल, गोंडवाना विद्यापिठ STRC. अवार्ड संस्था नागभिड बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिच्चपली येथील विद्यार्थी, वनसमिती सदस्य यांना २०१४ पासून आजपर्यंत वनकर्मचारी प्रशिक्षीत केलेले आहेत. सेवेच्या व प्रशिक्षणाच्या अनुभवातून माझी एक पहिली पुस्तक “महाराष्ट्रातील औषधीपनस्पती” ” या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक ९/६/२०२५ ला डॉ. अशोक कईके साहेब आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते चंद्रपुर येथे प्रकाशन करण्यात आले.

 

दिनांक १८/९/२०२५ जागतिक बांबू दिनानिमित्त दुसरी पुस्तक बांबू लागवड काळाची गरज या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. पाशा पटेल बांबू मॅन ऑफ इंडिया, भारत गोगावले मंत्री म. रा. मा. ना. पंकज भोयर मंत्री, आशीष जैस्वाल मंत्री, परविन परदेशी CEO mitrव इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला.

नामदेव कापसे सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या 34 वर्षांच्या अनुभवातून आपले अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून मांडल्याबद्दल वनकर्मचारी तसेच गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.