राष्ट्रीय स्तरावरील ऑन लाइन क्विझ स्पर्धा
चंद्रपूर, दि.18 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ऑन लाइन क्विझ स्पर्धा अयोजित करण्यात आली आहे. मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयाच्या वतीने 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत माय भारत (mybharat.gov.in) पोर्टलवर विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझ आयोजित करण्यात येत आहे. ही क्विझ विशेषत: 15 ते 29 वयोगटातील तरुणासाठी आहे.
सहभागींना 10 मिनिटांच्या कालावधीत 20 बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. ही क्विझ मोफत आहे आणि देशातील 12 प्रमुख भाषांमध्ये सोडवता येते. विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू आणि बक्षिसे दिली जातील. तसेच, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तरुणांना विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये सहभागी होऊन पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधण्याची अनोखी संधी मिळेल. विजेत्यांची निवड पूर्णपणे पारदर्शक संगणक आधारित लॉटरी प्रणालीद्वारे केली जाईल. ही क्विझ एक स्पर्धा नाही, तर भारताचे भविष्य घडवण्यासाठी तरुणांच्या विचारसरणी आणि उर्जेवर लक्ष केंद्रित करण्याची एक सुवर्णसंधी आहे, असे मेरा युवा भारत, जिल्हा युवा अधिकारी सुशील भड यांनी म्हटले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी (mybharat.gov.in) ला भेट द्यावी. ज्यांनी अद्याप या पोर्टलवर नोंदणी केली नाही, त्यांनी प्रथम बटणवर क्लिक करून स्वतःची नोंदणी करावी. आधीच नोंदणीकृत सहभागी, लॉग इन करून आणि विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझ क्लिक करून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.