आणीबाणीची सूचना ; इरई नदी काठावरील नागरीकांसाठी महत्वाची सुचना
फायर कंट्रोल रुम यांच्या मार्फत प्राप्त माहितीनुसार रहमन नगर भागातील चंद्रपूर शहर महानगरपालिका यांचे पाणी शुध्दीकरण केंद्रावर क्लोरिन गॅस (CHLORINE GAS) लीक झालेला आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि महानगरपालिका यंत्रणा सदर ठिकाणी तात्काळ पोहचले असुन त्या ठिकाणातील प्रभावित घरातील सदस्यांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यात येत असुन नागरीकांनी जिल्हा प्रशासन (आपत्ती व्यवस्थापन विभाग), पोलीस विभाग आणि महानगर पालिका यंत्रणेद्वारे वेळोवेळी देत असलेल्या सुचनांचे पालन करुन सदर परिस्थिती हाताळण्याकरीता योग्य सहकार्य करावे.
कोणत्याही अफवा वर विश्वास ठेवु नये व अफवा पसरवु नये.