नवरात्रौत्‍सवानिमीत्‍त संस्‍कार भारती करणार कर्तृत्‍ववान महिलांचा सन्‍मान.

नवरात्रौत्‍सवानिमीत्‍त संस्‍कार भारती करणार कर्तृत्‍ववान महिलांचा सन्‍मान.

नवरात्रौत्‍सवानिमीत्‍त संस्‍कार भारती चंद्रपूर शाखेच्‍या वतीने विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणा-या कर्तृत्‍ववान महिलांना सन्‍मानीत करण्‍यात येणार आहे. “शक्तिस्‍वरूपा” असे या स्‍त्री शक्‍ती गौरव सोहळयाचे शिर्षक आहे. हा सोहळा शनिवार, दिनांक २७ सप्‍टेंबर २०२५ रोजी सायं. ५.०० वा. न्‍यु इंडिया कॉन्‍व्‍हेंट, गुरूद्वाराजवळ, तुकूम, चंद्रपूर येथे संपन्‍न होणार आहे.

या स्‍त्री शक्‍ती गौरव सोहळयाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी दैनिक महाविदर्भच्‍या संपादक श्रीमती कल्‍पना पलिकुंडवार हया राहतील तर प्रमुख अतिथी या नात्‍याने श्रीमती प्रकाशकौर उपस्थित राहतील. या गौरव सोहळयात नृत्‍य प्रशिक्षक सौ. रेणुका मामीडवार, नाटय अभिनेत्री व जलतरणपटु स्‍नेहल राऊत, संगीत क्षेत्रातील सौ. सोनाली यादव, साहित्‍य क्षेत्रातील सौ. गीता रायपुरे, सामाजिक क्षेत्रातील डॉ. सौ. ज्‍योती राखुंडे, शिक्षण क्षेत्रातील सौ. अनुराधा भांदककर, वैद्यकिय क्षेत्रातील डॉ. पल्‍लवी इंगळे, रांगोळीच्‍या क्षेत्रातील सौ. प्रिती नवघरे, चित्रकलेच्‍या क्षेत्रातील सौ. ज्‍योती डाहे यांचा सन्‍मान करण्‍यात येणार आहे.

स्‍त्री शक्‍तीचा हा गौरव सोहळा अनुभवण्‍यासाठी, त्‍यांना शुभेच्‍छा व प्रोत्‍साहन देण्‍यासाठी नागरिकांनी या सोहळयाला मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन संस्‍कार भारती, चंद्रपूरतर्फे करण्‍यात आले आहे