वंचित बहुजन महीला आघाडी च्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
रणमोचन गावातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था तात्काळ दुरूस्ती व वाहतुकीस योग्य रस्ता करावा.
बातमी – मंगेश बनसोड
ब्रम्हपुरी, रणमोचन गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,रणमोचन ते रणमोचन फाटा (लामना फाटा) पर्यंतचा रस्ता हा रेतीचा ट्रक व जड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये- जा करणार्या वाहनांना व पायी जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रणमोचन गावातील रेती घाटाचे हेवी लोड असलेले ट्रक या रस्त्यावर सतत ये-जा करत असल्यामुळे रस्ता पुर्णपणे उध्वस्त झाला आहे.रस्त्यावरून गाडी चालवणे कठीण झाले आहे. रणमोचन गावातील लोकांना या समस्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था होवून सुद्धा रणमोचन या गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील पदाधिकारी,गावातील सरपंच,सदस्य याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन महीला आघाडी ब्रम्हपुरी व रणमोचन गावातील नागरिकांनी केला आहे .
तात्काळ रणमोचन या गावातील रस्त्यांची पूर्ववत दुरूस्ती करावी या मागणीला आता जोर येत आहे .
निवेदन देतना लिनाताई रामटेके जिल्हा उपाध्यक्षा, गणेश शेंडे,गंगाधर ढोरे, लता मेश्राम,चंदा माटे,सुकेशनी चौधरी,सारीका खोब्रागडे,अनुपमा जनबंधू, विजया खोब्रागडे,विद्या बागडे, निरू खोब्रागडे शिला निहाटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.