B.S.N.L. चे कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांना अटक
चोरीचा माल व इतर साहित्य असा एकुण ४४,४८,३००/- रु. चा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी
दिनांक ०८/०९/२०२५ रोजी फिर्यादी श्री अभिजीत अशोक जिवणे, वय ४५ वर्ष रा. नगीनाबाग चंद्रपूर (कनिष्ठ अभियंता, दुरसंचार विभाग, चंद्रपूर) यांनी पोलीस ठाणे रामनगर येथे बिएसएनएल कंपनीचे कॉपर केबल किं. अं. २४,००,०००/- रु. चा चोरी गेल्याबाबत रिपोर्ट दिल्याने अप.क्र.७४१/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्हयाबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने गुन्हयाचा तंत्रबध्द व सखोल तपास करुन गोपनियरित्या माहिती काढली असता गुन्हयातील चोरीस गेलेल्या वर्णनाचा मुद्देमाल भरुन असलेला एक आयशर कोसारा रोडवर लपलेल्या स्थितीत उभा असल्याची माहिती काढुन सदर ठिकाणी जावुन चौकशी केली असता आरोपी नामे (१) नरेंद्र सोरनसिंह मौर्या वय २२ वर्ष रा. उधैनी (२) नाजीम शोख असमुद्दीन शेख वय २६ वर्ष रा. कलपीया दोन्ही ता.जि. बदायु (उत्तरप्रदेश) यांचे ताब्यातील एक आयशर ट्रक क्र. युपी-२४-बीटी-७०४६ मध्ये गुन्हयातील चोरीस गेलेला बीएसएनएलचा कॉपर केबल किं. २४,००,०००/- रु. व इतर साहित्य मिळुन आल्याने सदर चोरीचा माल, वाहन व इतर साहित्य (हेलमेट, रिफ्लेक्टर, जॉकेट, प्लॉस्टीक बॅरीकेट) असा एकुण ४४,४८,३००/- रुपयाचा माल सदर आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपींनी हेलमेट, रिफ्लेक्टर, जॉकेट, प्लॉस्टीक बॅरीकेट चा वापर करुन स्वतःला कंत्राटी कामगार भासवुन दुरुस्ती कामाचे नावाने कॉपर केबल वायर कापुन चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कॉक्रेडवार, सपोनि श्री बलराम झाडोकर, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, पोउपनि श्री सुनिल गौरकार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा गणेश भोयर, जयंत चुनारकर, नितेश महात्मे, सचिन गुरनुले, किशोर वैरागडे, जयसिंग, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, चेतन गज्जलवार, गणेश मोहुर्ले, अजय बागेसर, नितीन कुरेकार, सुरेद्र महंतो, संजय वाढई, दिपक डोंगरे, पोअं मिलींद जांभुळे, प्रदिप मडावी, शशांक बादामवार, किशोर वाकाटे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, अजित शेन्डे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, चापोहवा दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.