“ नागभीड पोलीसांनी अल्पवयीन मुलीला केले सुखरूप पालकाचे स्वाधीन”

“ नागभीड पोलीसांनी अल्पवयीन मुलीला केले सुखरूप पालकाचे स्वाधीन”

दिनाक 30.08.2025 रोजी पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रारदार यांनी त्यांचे अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावुन पळवून नेले आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो. स्टे नागभीड अपराध क्रं. 317/2025 कलम 137 (2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी स.पो.नी दिलीप पोटभरे यांनी पोलीस निरीक्षक श्री. रमाकांत कोकाटे पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनात सदर अल्पवयीन पिडीत मुलीचा शोध घेण्याकरीता गावात सखोल चौकशी केली तसेच गोपनीय बातमीदार लावुन माहीती काढण्याचा प्रयत्न केला असता त्याच गावातील एक मुलगा त्या घटनेपासुन गावात नसल्याची माहीती मिळाल्याने सदर संशयीत मुलाचे मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याचे CDR, SDR काढुन त्यातील संशयीत क्रमांकावर संपर्क केला. सदर अल्पवयीन मुलगी ही आरोपी नामे अतुल उध्दव गायकवाड रा. वासाळा मेंढा व त्याचा भासा समीर ईश्वर बोरकर रा. पिपर्डा याचे सोबत असल्याची खात्री झाली व ते दोघेजन विष प्राशन करून आत्महत्या करणार असल्याची माहीती मिळाल्याने ताबडतोब आरोपीचा भाचा नामे समीर ईश्वर बोरकर यांचे मोबाईल क्रमांकाचे करंट लोकेशन प्राप्त केले. सदरचे लोकेशन पो.स्टे. फलटण ग्रामीण जि. सातारा येथील आल्याने त्या दोघांनाही आत्महत्या करण्यापासुन परावृत्त करण्याकरीता मा. ठाणेदार पो.स्टे. फलटण यांना संपर्क करून माहीती देण्यात आली. मा. ठाणेदार पो.स्टे. फलटण यांनी पिडीता व आरोपीचा शोध घेतला असता पिडीता व आरोपी मौजा उपाल्वे ता. फलटण येथे मिळुन आले त्यांना आत्महत्ये पासुन परावृत करून ताब्यात घेतल्याने सदर पो.स्टे. नागभीड येथील एक अधिकारी, एक महीला व पुरूष अंमलदार असे पथक पाठवुन पो.स्टे. नागभीड येथे आणण्यात आले. दिनांक 05.09.2025 रोजी आरोपी क्रं. ०१) नामे अतुल उध्दव गायकवाड वय ३१ वर्षे रा. वासाळा मेंढा व त्याचा भासा आरोपी क्रं.०२) समीर ईश्वर बोरकर वय २४ वर्षे रा. पिपर्डा यांना अटक करून जेल दाखल करण्यात आले व यातील पिडीतेला तिचे आई-वडीलांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी मा. पो. अ. श्री. मम्मुका सुदर्शन सा. मा. अपर पो. अ. श्री. ईश्वर कातकडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. रमाकांत कोकाटे पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनात स.पो.नी दिलीप पोटभरे, पोहवा विनोद गायकवाड, पो.अं. जय रोहनकर, म.पो.अं. आरती लुटे यांनी तंत्रशुध्द पध्दतीने तपास करून अवघ्या पाच दिवसात अल्पवयीन पिडीत मुलीचा शोध घेऊन पिडीता व आरोपी यांना आत्महत्ये पासुन वाचवले तसेच पिडीतेला तिचे आई-वडीलांचे सुखरूप स्वाधीन करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.