जश्ने ईद-ए-मिलाद सिंदेवाहीत उत्साहात व शांततेत संप्पन” 

जश्ने ईद-ए-मिलाद सिंदेवाहीत उत्साहात व शांततेत संप्पन” 

ईद-ए-मिलाद, म्हणजेच पैगंबर मुहम्मद (स.अ.व.) यांचा जन्मदिन, मुस्लिम बांधवांनी श्रद्धेने केला साजरा.

जगभरात हे पर्व प्रार्थना, दान, ऐक्य आणि मानवी प्रेमाचा संदेश देणारा उत्सव म्हणून मानला जातो.

जुलूसाची सुरुवात जामा मस्जिदपासून झाली. गांधी चौक, गुरुदेव चौक, सिद्धार्थ चौक, पोलिस स्टेशन मार्गे, लोनवाही, मदनापुर वार्ड, आज़ाद चौक आणि एकता चौक या मार्गाने मिरवणुक काढण्यात आली. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात झालेली मिरवणूक दुपारी १२ वाजता शांततेत संपन्न झाली. मिरवणुकीत सर्व वयोगटातील मुस्लिम समाज बांधव, महिला, तरुण आणि लहान मुले उपस्थित.

“नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर” च्या रॅलीत घोषणां,

मिरवणुकीदरम्यान नात-शरीफ, सलाम याचं पठण. 

शरबत, लंगरचे आयोजन करण्यात आला.

सिंदेवाही येथे झालेलं आयोजन केवळ धार्मिक पर्व न ठरता, सांस्कृतिक आणि समाजबंध वृद्धिंगत करणारा उत्सव ठरला आहे. गांधी चौक येथे या मिरवणूकिचा फुलांनी स्वागत करण्यात आला, एकता, शांतता आणि मानवी प्रेमाचा संदेश देत जश्ने ईद-ए-मिलाद उत्साहात पार पडलं.