4 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 3 : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचे स्वरुप येण्यासाठी जिल्हा पातळीवर महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबतचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे वतीने जिल्हा पातळीवर 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात भजन/लोककला/गायन/नाटय/ नृत्य अशा विविध प्रयोगात्मक कलांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रम नि:शुल्क आहे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिक्षक नरेशकुमार बहीरम यांनी कळविले आहे.