मागील ५ दिवसात मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे व जबरीचोरीचा १ गुन्हा उघड

मागील ५ दिवसात मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे व जबरीचोरीचा १ गुन्हा उघड

एकुण ६ आरोपी अटक, ४ दुचाकी वाहनासह ३,७०,०००/- रु. किंमती चा माल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कारवाई

दिनांक २६/०८/२०२५ रोजी तीन युवक त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल सह सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी जावुन सदर युवकांची चौकशी केली असता तिन्ही रेकॉर्ड वरील आरोपी असुन आरोपी (१) योगेश चक्रधर सहारे वय १९ वर्ष रा. येरगांव सिंदेवाही, (२) अभय अनिल बोरकर वय २३ वर्ष (३) साहिल संदिप बोरकर वय १९ वर्ष दोन्ही रा. लोणवाही, सिंदेवाही यांचे ताब्यातील मोटार सायकल होंडा युनिकॉर्न क्रमांक एम.एच.३४-सीजी-९९३१ किंमत अंदाजे १,००,०००/- रु. ची ही पोलीस स्टेशन सिंदेवाही अपराध क्रमांक २१९/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३ या गुन्हयातील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

दिनांक २६/०८/२०२५ रोजी एक युवक रयतवारील कॉलरी परिसरात मोटार सायकल विक्री साठी फिरत असल्याचे माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी सापळा रचुन आरोपी नामे कुणाल सुरेश कानपिल्ली वय २३ वर्ष रा. रयतवारी कॉलरी चंद्रपूर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याचे ताब्यातील मोटार सायकल बजाज प्लेटिना क्रमांक एम.एच. ३४-बी.जे-९०३५ किंमत अंदाजे ८०,०००/- रु. ची ही पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्रमांक ४४२/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३ या गुन्हयातील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

दिनांक २८/०८/२०२५ रोजी पोस्टे भद्रावती हद्दीत मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हयातील एक युवक नामे शिवनारायण उर्फ मनिष बलराम हरीनखेडे वय २५ वर्ष रा.मदनपुर ता. वारशिवनी यास स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा रचुन ताब्यात घेवुन त्याने जबरीने चोरलेली मोटार सायकल होंडा शाईन क्रमांक एम.एच. ३४-सीए-०९२० किंमत अंदाजे ८५,०००/- रु. व एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकुण,०००/- चा माल हा पोलिस स्टेशन भद्रावती अपराध क्रमांक ३४८/२०२५ कलम ३०९ (४) भारतीय संहिता-२०२३ या जबरी चोरीचे निष्पन्न झाले आहे.

दिनांक ३१/०८/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक महाकाली मंदीर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना महाकाली वार्ड चंद्रपूर येथे एक इसम त्याचे ताब्यातील मोटार सायकलसह संशयीतरित्या फिरत असतांना मिळुन आल्याने त्याचेकडे विचारपुस केली असता त्याचे ताब्यातील मोपेड टिव्हीएस ज्युपिटर क्लासीक क्रमांक एम.एच.३४-बीवाय-२५९७ किंमत १,००,०००/- रु.ची ही पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर अपराध क्रमांक ६३४/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३ या गुन्हयातील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कॉक्रेडवार, पोउपनि श्री विनोद भुरले, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, पोउपनि श्री सुनिल गौरकार, पोहवा नितीन साळवे, नितीन कुरेकार, जयंत चुनारकर, प्रमोद कोटनाके, गजानन मडावी, इमरान खान, गोपीनाथ नरोटे, सतिश अवथरे, सुभाष गोहोकार, दिपक डोंगरे, जयसिंह, नितीन रायपुरे, संतोष येलपुलवार, रजनीकांत पुठठावार, सचिन गुरनुले, पोअं अमोल सावे, मिलींद जांभुळे, अजीत, शशांक बादामवार, गणेश मोहुर्ले, प्रसाद धुळगंडे, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता चापोहवा दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.