वन स्टॉप सेंटरकरीता वाहनाची आवश्यकता Ø सात दिवसांच्या आत दरपत्रक / निविदा सादर करण्याचे आवाहन

वन स्टॉप सेंटरकरीता वाहनाची आवश्यकता

Ø सात दिवसांच्या आत दरपत्रक / निविदा सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 29 : केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेतील संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याचे उद्देशाने वन स्टॉप सेंटर ही योजना चंद्रपुर जिल्ह्यात कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिला, लैंगिक शोषणाच्या पिडीत, मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या, अॅसिड हल्ल्यातील पिडीत महिला, लैंगिक शोषणाच्या पिडीत महिलेस तात्काळ वैद्यकीय सुविधा, पोलिस मदत मिळावी तिचे समुपदेशन व्हावे, तात्पुरता निवास सेवा, कायदेशीर सेवा व आपात्कालीन मदत इत्यादी सेवा उपलब्ध करून वन स्टॉप सेंटर येथे कामकाज सुरू आहे.

वन स्टॉप सेंटर येथे येणाऱ्या पिडीत महिलेला उपरोक्त सेवा तातडीने पुरविण्यास तथा सदरील परिस्थिती हाताळण्यासाठी संकटाच्या ठिकाणावरून त्यांची सुटका करणे, गृहचौकशी करणे, कुटुंबात पुनर्स्थापना करणे, रुग्णालय, न्यायालय, पोलिस स्टेशन, तथा इतर आवश्यक ठिकाणी जाणे-येणे तसेच सदरील योजनेची जिल्ह्यात जाणीव जागृती व प्रसिध्दी करणे इत्यादी बाबी तथा कार्यालयासाठी भाडेतत्वावर वाहनाची आवश्यकता आहे.

तसेच भाडेतत्वावरील वाहनांवर वन स्टॉप सेंटरचा पत्ता, दुरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, केंद्राच्या कार्याची थोडक्यात माहिती दर्शवायची आहे, जेणेकरून गरजू महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क करणे सोईचे होईल. त्याचप्रमाणे सदरील वाहनावर योजनेचा लोगो व इतर आवश्यक माहिती दर्शवून ब्रँडींग करणे आवश्यक आहे. तथापि, वन स्टॉप सेंटर हे २४x७ कार्यरत असल्याने यासाठी उपलब्ध करून घ्यावयाचे वाहन देखील २४x७ केंद्रावर उपलब्ध असणे आवश्यक आहे. सदरचे वाहन ७ (६+१) व्यक्तीची क्षमता असलेले SUV वाहन व तीन वर्षापेक्षा जास्त जुने नसावे. वरीलप्रमाणे वाहन उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक वाहनास (वाहनचालकासह व इंधनासह) रु. 4 लक्ष 50 हजार वार्षिक दर केंद्र शासनाने निश्चित केला आहे.

अटी व शर्ती : 1. पुरवठाधारकांनी प्रादेशिक परिवहन विभागाचे ऑल इंडिया परमिट असलेले वाहन सेवेसाठी द्यावे. सदर वाहन 3 वर्षापेक्षा जुने नसावे. 2. सदरचे वाहन २४ x ७ वन स्टॉप सेंटरला ठेवण्यात यावे. 3. वाहन चालक निर्व्यसनी असावा. 4. वाहनात इंधन व वाहनचालकाचे मानधन हे सर्व पुरवठाधारकास करावे लागेल. 5. वाहनावर योजनेची माहिती संबंधित स्टीकर व इतर माहिती चिटकविण्यात येईल, त्यास पुरवठाधारकाने मनाई करू नये. 6. सदर वाहनाचा वापर इतर कामासाठी करता येणार नाही. 7. शासनाने वाहनाचे वार्षिक भाडे 4 लक्ष 50 हजार रुपये ठरवून दिलेले आहे, त्यापेक्षा कमी दराचे दरपत्रक प्राप्त झाल्यास कमी दराचे दरपत्रकास प्राधान्य देण्यात येईल. 8. वाहन ना-दुरुस्त झाल्यास 5 दिवसात दुरुस्त करावे व सेवा उपलब्ध करून द्यावी अन्यथा त्याचे भाडेकरार संपुष्टात येईल. 9. वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या अनुदान उपलब्धतेनुसार त्याचे भाडे अदा करण्यात येईल.

उपरोक्त प्रमाणे सदरील वाहनाबाबत अटी व शर्ती मान्य असेल अशा वाहनधारकाने सदरील जाहिरात वर्तमानपत्रकात प्रसिध्द झाल्यापासून सात (7) दिवसाच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपुर यांचे कार्यालय, आकाशवाणीचे मागे, चंद्रपुर या कार्यालयाशी संपर्क साधुन कार्यालयीन वेळेत निविदा/दरपत्रक सादर करावे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.