“फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह संपन्न”
आधा घंटा रोज, फिटनेस का डोस चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमानाने
भारत सरकारच्या क्रिडा विभागाच्या व “फिट इंडिया” मोहिमे अंतर्गत आज दिनांक २६ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ०७:०० वाजता पटेल हायस्कुल समोर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पासुन ते दुर्गापूर रोड- पद्मापुर गेट ते पोलीस सभागृह तुकूम पर्यत सायकलथॉन चे आयोजन करण्यात आले होते. सदर सायकलथॉन जिल्हा पातळीवरील पोलीस अधिकारी व अंमलदार सह पोलीस कुटूंबियांनी सहभाग नोंदविला असुन जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत माध्यमिक शालेय विद्यार्थी आणि चंद्रपूर शहरातील Go Green Cycle Group चे सदस्यांनी सुध्दा सहभाग नोंदविला आहे.
याद्वारे नागरिकांना आव्हाण करण्यात येते की, सदर सायकलथॉन चा मुख्य उद्देश हा Say No To Drug Dose – आधा घंटा रोज, फिटनेस का डोस या संदेशाचा प्रसार करणे व फिटनेसला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविणे हा आहे.
सदर सायकलथॉन पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली असुन अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांनी हिरवी झेंडी दाखवुन सदर सायकलथॉनची सुरुवात करुन स्वतः सुध्दा सहभाग नोंदविला असुन त्यांच्या समवेत जिल्हयातील प्रतिष्ठीत डॉक्टर श्री मंगेश गुलवाडे व व्यवसायिक श्री अनिल टहलयानी, श्री संदीप बच्चुवार, श्री शाकीर उकाणी, श्री आबीद भाई, श्री अक्षय राउत, श्री धर्मा गावंडे आणि सायकल क्लबचे अनेक सदस्यांसह जिल्हा परिषद चंद्रपूर येथील श्री फटींग, श्री विशाल देशमुख व जि.प. माध्यामिक शाळेचे शिक्षक वृंद व विधार्थी-विद्यार्थीनी आणि चंद्रपूर उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव, पोनि श्री महेश कोंडावार, श्री प्रविणकुमार पाटील, श्री आसिफराजा शेख, श्री निशीकांत रामटेके, श्री संदीप एकाडे, रापोनि श्री किसन नवघरे, रापोउपनि श्री रासेकर, सपोनि श्री हिमांशु उगले, श्री देवराव नरोटे, अश्विनी वाकडे, पोउपनि संदीप बच्छिीरे, श्री चंद्रकांत पेद्दीलवार सह पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर, रामनगर, दुर्गापूर येथील अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.