अवैधरित्या गांजा बाळगणाऱ्यां दोघांविरुध्द गुन्हा दाखल
१७९ ग्रॅम गांजा आणि एक मोटार सायकल व नगदी असा एकुण १,०४,८०/- रु चा मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन मुल ची कामगिरी
दिनांक २१ ऑगस्ट, २०२५ रोजी सायंकाळी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन जुना सोमनाथ मंदीर परिसर, मुल रेल्वे स्टेशन, मुल येथे एका मोटार सायकलवरील दोन युवकांना ताब्यात घेवुन त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल बजाज पल्सर क्रमांक MH34-CE-6620 च्या मागील सिटच्या खाली विक्री करण्याचे उद्देशाने अमली पदार्थ सुकलेला गांजा वनस्पती १७९ ग्रॅम किंमत ३५८०/- रु.चा अमली पदार्थ अवैध रित्या मिळुन आल्याने आरोपी (१) रोहीत वय २० वर्ष, (२) आदित्य वय १९ वर्ष दोन्ही मुल यांचेविरुध्द पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक ३४०/२०२५ कलम ८ (सी), २० (बी), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन त्यांचे ताब्यात मिळुन आलेला गांजा, नगदी ५०० व मोटार सायकल असा एकुण १,०४,८०/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पो.स्टे. मुल ठाणेदार पोनि श्री विजय राठोड यांचे नेतृत्वात सपोनि श्री सुबोध वंजारी, श्री अमितकुमार आत्राम, पोहवा /२३९७ भोजराज मुंडरे, पोहवा /१७०३ इंदल राठोड, नापोअ/२४९७चिमाजी देवकते, पोअं/१८३ नरेश कोडापे, पोअं/१२३२ शंकर बोरसरे सर्व पोलीस स्टेशन मुल यांनी केली आहे.