गुन्हेगाराकडून ५७.२६० ग्रॅम एम.डी. मॅफेड्रॉन ड्रग्स पावडरसह कि. ४,९१,१००/-रु. मुद्देमाल जप्त

चंद्रपूर शहरातील रहमतनगर येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडून ५७.२६० ग्रॅम एम.डी. मॅफेड्रॉन ड्रग्स पावडरसह कि. ४,९१,१००/-रु. मुद्देमाल जप्त

आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे रामनगर येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट -१९८५ कलम-८ (क), २१ (क) अंतर्गत गुन्हा दाखल

संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालीबाबत चंद्रपूर पोलिसांचे व्हॉट्सअँप क्रमांक 7887890100 वर त्वरीत कळवावे.

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन रामनगर ची संयुक्त कामगिरी

चंद्रपुर जिल्ह्यामध्ये श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे, व्यवसाय करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर जिल्हा पोलीसांच्या वतीने चालु आहे. याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कायदेशिर कारवाई सुरू आहे.

दिनांक २२/०८/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, चंद्रपुर जिल्हयातील रहमतनगर चंद्रपुर येथे राहणारा रेकॉर्डवरील तसेच कुख्यात व अत्यंत धोकादायक गुन्हेगार हा त्याचे घरी अमली पदार्थ मॅफेड्रॉन (एम.डी) ड्रग्स पावडर विक्री करण्याचे उद्देशाने स्वतः चे घरी बाळगुन आहे. अश्या माहितीवरुन सांयकाळ दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन पंच व राजपत्रीत अधिकाऱ्यांचे उपस्थित आरोपीचे घरावर छापा टाकुन त्याचे ताब्यातील एकुण ५७.२६० ग्रॅम एम.डी. सह एकुण-४,१९,१००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे रामनगर येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट-१९८५ कलम-८ (क), २१ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर करीत आहे.

सदरची कामगिरी श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अमोल काचोरे,

पोलीस ठाणे रामनगर चे पोलीस निरीक्षक श्री.आसिफराजा शेख, सपोनि श्री.दिपक कांक्रेडवार, श्री.बलराम झाडोकार, सपोनि श्री.निलेश वाघमारे, सपोनि श्री.देवाजी नरोटे, पोउपनि श्री.विनोद भुरले, पोउपनि श्री.सुनिल गौरकार, पोउपनि श्री.सर्वेश बेलसरे, सफौ. स्वामीदास चालेकर, पोहवा. प्रकाश बल्की, पोहवा. सुभाष गोहोकार, पोहवा. रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा. सतिश अवथरे, पोहवा, दिपक डोंगरे, पोहवा. इमरान खान, पोहवा. किशोर वैरागडे, पोहवा. अजय बागेसर, पोहवा. लालु यादव, पोहवा.बाबा नैताम, पो.अं. हिरालाल गुप्ता. पो. अं. शशांक बदामवार, पोअं. गोपीनाथ नरोटे, पोअं. शेखर माथनकर मपोअं. उषा लेडांगे, विजयमाला वाघमारे, दिपीका सोडनार, निराशा तितरे, अर्पणा मानकर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर

तसेच पोलीस ठाणे रामनगर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे नागरीकांना आवाहन :-

अंमली पदार्थाची विक्री व सेवन ही गंभीर आणि समाजासाठी अत्यंत घातक बाब आहे. युवकांचे भविष्य उध्दवस्त करणाऱ्या अशा अंमली पदार्थाच्या साखळीचा नायनाट करण्यासाठी पोलीसाना सहकार्य करावे व संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालीबाबत चंद्रपूर पोलिसांचे व्हॉट्सअँप क्रमांक 7887890100 वर त्वरीत कळवावे.