दोन आरोपी अटकेत // मुद्देमाल हस्तगत // ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनची कार्यवाही
पोस्ट अप क्रमांक 90/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अप.क्रमांक108/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता
असे वेगवेगळे गुन्ह्यात चोरी गेलेले 1)सबमर्सिबल मोटार पंप, 2)सोलर सबमर्सिबल मोटर पंप, 3) 35 फूट मोटार पंपासाठी वापरण्यात आलेला केबल असा एकूण अंदाजे किंमत 44000/- रु.मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा नोंद होऊन आरोपीच्या शोध घेतले असता आरोपी क्रं. 1 रणजीत खुशाल मेंढे वय 21 वर्ष राहणार उदापूर 2. विधी संघर्ष बालक वय 15 वर्ष मिळून आले गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक साहेब, पो. नि बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी मनोज खडसे , पो. हवा मुकेश गजबे, योगेश शिवणकर, अजय कटाई, पो. अ निलेश तुमसरे, ईशाद खान, स्वप्नील पळसपगार ,चंदू कुलसंगे यांनी केली पुढील तपास पो. हवा मुकेश गजबे करीत आहे.