राज्यातील ऑटोरिक्षा चालकांची मागणी पूर्ण HSRP नंबर प्लेटकरिता ३१ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली – राजेंद्र खांडेकर
महाराष्ट्र राज्यातील सर्व वाहनधारकांसाठी HSRP (High Security Registration Plate) लावणे अनिवार्य करण्यात आलेले होते. शासनाच्या निर्देशानुसार यासाठी अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 असं निश्चित करण्यात आलेली आहे. तथापि… खालील कारणास्तव नागरिकांने आपल्या वाहनांस वेळेच्या आत ही प्लेट बसवणे कठीण जात आहे. त्याचे मुख्यत अडचणी: HSRP पोर्टलवरील अडचणी: वेबसाइट/पोर्टल वर वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या याकरीता महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक राज्यशासनाला विनंती करण्यात आली HSRP नंबर प्लेट करीता मुदत वाढ देण्यात यावी ही मागणी मान्य करीत दि. १४ ऑगस्ट रोजी शासनाने परिपत्रक काढून राज्यातील गाडी चालकांना दि. ३१ नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. ही मागणी मंजुर केल्याबद्दल राज्य शासनाने महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेतर्फे स्वागत करण्यात येत आहे. असे आवाहन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, उपाध्यक्ष विनोद चन्ने, सचिव सुनिल धंदरे, जहीर शेख, जाकीर शेख, रवी आंबटकर, कुंदन रायपुरे, किशोर वाटेकर, विलास बावणे, रमेश वझे, रमेश मुन, महेश ढेकडे यांनी राज्य शासनाचे स्वागत केले आहे.