सिंदेवाही–मेंढा माल मार्गावर एका पाठोपाठ अपघात; पुरोगामी पत्रकार संघाने दाखवली तत्परता, अपघात टळले
प्रतिनिधी- रोशन
सिंदेवाही-नागभिड राज्य मार्गावर मेंढा माल जवळ रस्त्याचे मधोमध मोठा खोल खड्डा पडल्यामुळे एका पाठोपाठ सात वाहनांना मोठे नुकसान झाले एका कारचे टायर फुटले तर एका कारच्या इंजिनचे चेंबर फुटले व काहींना दुखापतही झाली आहे.
या घटनेची माहिती नोमान पटेल (कुरेशी) यांनी फोनद्वारे पुरोगामी पत्रकार संघाला दिली, पुरोगामी पत्रकार संघांचे अध्यक्ष मिथुन मेश्राम, सचिव अमान कुरेशी,रोषन खानकुरे यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची पहानी केली असता रस्तेच्या मधोमध खुप मोठा खड्डा पडला होता.
दिवसांच्या उजेडात अपघात टळले मात्र रात्र होताच एका पाठोपाठ सात वाहनांचे अपघात झाले.
पुरोगामी पत्रकार संघातर्फे त्या ठिकाणी पुन्हा आज रात्री अपघात होऊ नये म्हणून गजानन बोरकर यांना घेऊन एका झाडाला तोंडुन त्या खड्ड्यात टाकले आहे सध्या स्थितीत वाहतूक सुरळीत सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग सदर समस्येकडे तात्काळ गंभिरतेने लक्ष घालून रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ करावे,अशी मागणी या बातमीच्या माध्यमातून पुरोगामी पत्रकार संघातर्फे केली आहे.
पुढे कुणाचा अपघात किंवा नुकसान झाल्यास संपूर्ण जिम्मेदारी सार्वजनिक बांधकाम विभाग सिंदेवाही राहील.