अवैध देशी विदेशी दारू व शस्त्र साठा प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कारवाई १०,७४,४२०/- रुपयाची मालमत्ता जप्त

अवैध देशी विदेशी दारू व शस्त्र साठा प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कारवाई १०,७४,४२०/- रुपयाची मालमत्ता जप्त

दिनांक २९/०७/२०२५ रोजी पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले हे पोलीस स्टॉफ सह चंद्रपुर शहरात प्रोव्हीबीशन, जुगार रेड, सुगंधित तंबाकु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणे कामी रखाना होवुन पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर दृवारे खबर मिळाली की, आंबेडकर नगर बाबुपेठ वार्ड चंद्रपुर येथे राहनार इसम नामे श्रीनिवास नरहरी हा आपल्याजवळील स्पीफट चारचाकी वाहनात व स्वतःचे घरी मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील अवैधरित्या देशी, विदेशी दारू विक्री करिता बाळगुण ठेवला आहे. तेव्हा सदर माहीतीच्या अनुषंगाने धाड टाकुण पंचा समक्ष घर व वाहनाची घरझडती घेतली असता, मध्यप्रदेश व महाराष्ट्रतील देशी व विदेशी दारूच्या एकुण ४९ पेटया किंमत अंदाजे ४,७६,९२०/- रूपये, दारू विक्रीतुन मिळालेली नगदी रक्कम ९७,०००/-रूपये, दारू वाहतुकी करिता वापरलेले चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३२ वाय ०९२६ किमंत ५,००,०००/-रूपये, एक धारदार लोंखडी तलवार किंमत ५००/- रूपये असा एकुण १०,७४,४२०/-रूपयाचा मुद्देमाल मिळुण आला. सदर प्रकरणात आरोपी नामे श्रीनिवास नरहरी याचे विरूदध पोलीस स्टेशन रामनगर येथे अप.क्र. ६१४/२०२५ कलम ६५ (ई), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा, सहकलम ४,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करूण मुट्टदेमाल पोलीस स्टेशन रामनगर येथे जमा करण्यात आला.

सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा /सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठावार, पोहवा / दिपक डोंगरे, पोहवा /इम्प्रनखान, पोअ/किशोर वाकाटे, पोअ/हिरालाल गुप्ता, मपोअ अपर्णा मानकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.