गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत स्किलींग इन्स्टिट्युटच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण समारंभसंपन्न

गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत स्किलींग इन्स्टिट्युटच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण समारंभसंपन्न

सन २०२४-२५ या वर्षात एकूण १०५० प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आले विविध प्रकारचे प्रशिक्षण

गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे कौशल्य विकास केंद्र (स्किलिंग इन्स्टिटयुट) ची सुरुवात करण्यात आली होती. या स्किलींग इन्स्टिट्युटच्या माध्यमातून सॉफ्टवेअर डेवलपर, वेब डेवलपर, चारचाकी वाहन चालक व सुरक्षा रक्षक प्रशिक्षण देण्यात येत असते. या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना ‘प्रमाणपत्र वितरण समारंभ’ आज दिनांक २४/०७/२०२५ रोजी पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉल येथे पार पडला.

आतापर्यंत गडचिरोली पोलीस दलामार्फत स्किलींग इन्स्टिट्युटच्या माध्यमातून विविध कोर्सेसमध्ये एकूण १३८० युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सॉफ्टवेअर डेवलपर, वेब डेवलपर, चारचाकी वाहन चालक व सुरक्षा रक्षक या चारही प्रशिक्षणांसाठी एकूण ३५ सत्रांमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सन २०२४-२५ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील एकूण १०५० प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, ‘आजचे युग हे स्पर्धेचे युग असून प्रगतीसाठी कोणताही शॉर्टकट नाही. तसेच मेहनत, चिकाटी आणि लक्ष साध्य करण्याची जिद्द हीच यशाची गुरुकिल्ली आहे. यासोबतच पुढील भविष्यासाठी आपले टार्गेट निश्चित करुन न थांबता पुढे चालत राहा. येत्या काळात गडचिरोली पोलीस दलाच्या स्किलींग इन्स्टिट्युटच्या माध्यमातून AI (Artificial Intelligence) सारखे आधुनिक कौशल्यांचे देखिल प्रशिक्षण दिले जाणार असून त्यात जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभाग घ्यावा.’

सदर प्रमाणपत्र वितरण समारंभास पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या उपस्थितीत पार पडला.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.