चंद्रपूर मनपात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी

चंद्रपूर मनपात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी

चंद्रपूर २३ जुलै – भारतीय असंतोषाचे जनक, स्वातंत्र्यलढयाचे थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त चंद्रपुर महानगरपालिकेच्या वतीने २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विनम्र अभिवादन करण्यात आले..

याप्रसंगी बोलतांना मार्गदर्शन करतांना अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी सांगितले की, लोकमान्‍य टिळक केवळ स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक किंवा स्‍वातंत्र सेनानी नव्‍हते तर त्‍याही पलीकडे ते गणिततज्ज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, कवी, लेखक, वक्ते, पत्रकार, शिक्षक, राजकारणातील द्रष्टेपणा असलेले लढवय्ये, भारतीय असंतोषाचे जनक असे अष्‍टपैलू व्‍यक्तिमत्‍त्‍व होते. लोकमान्य टिळकांनी दिलेला ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,’ या घोषणेने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बदलण्यासह ब्रिटिश राजवटीला उलथून टाकण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये जागवला.

मनपा मुख्य इमारतीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी माल्यार्पण करून करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उपायुक्त संदीप चीद्रावार,डॉ.नरेंद्र जनबंधु,माधवी दाणी,प्रदीप पाटील, ग्रेस नगरकर व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.