डाक विभागात IT 2.0 प्रणालीची अंमलबजावणी
चंद्रपूर, दि. 23 : डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये मोठे बदल घडवून आणण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याकरीता डाक विभागात IT 2.0 या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. या प्रणालीमुळे डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणारी सेवा ही अचुक, जलद व ग्राहकाभिमुख होईल.
सदर IT 2.0 प्रणालीची अंमलबजावणी 5 ऑगस्ट 2025 रोजी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व डाकघरात होणार आहे. याकरीता Data Transfer ही अत्यंत महत्वाची प्रक्रीया असते, जी 4 ऑगस्ट रोजी केल्या जाईल. या कारणामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील डाक विभागाशी संबंधीत सर्व कामे ही दिनांक 4 ऑगस्ट रोजी बंद राहतील. सर्व ग्राहकांना विनंती आहे की, त्यांचे डाक विभागाशी संबंधीत जी काही तातडीची कामे आहेत, ते कृपया 2 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करुन घ्यावे.
ग्राहकांच्याच हितासाठी व त्यांना अचूक, जलद व ग्राहकाभिमुख सेवा मिळावी, याच उद्देशाने हे सर्व प्रयत्न केल्या जात आहेत. तरी सर्व ग्राहकांनी यांची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ डाक अधिक्षक एस. रामाक्रिष्णा यांनी केले आहे.