संस्कार भारतीच्या रेषारंग चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर 20 जुलै रोजी होणार पारितोषिक वितरण

संस्कार भारतीच्या रेषारंग चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर 20 जुलै रोजी होणार पारितोषिक वितरण

संस्कार भारती चंद्रपूरच्या वतीने जागतिक योग दिना निमित्त आयोजित रेषारंग चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेतील विजेत्यांना दि. 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आयोजित संस्कार भारती च्या गुरुपौर्णिमे निमित्त आयोजित गुरु सन्मान सोहळ्यात पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे.

या चित्रकला स्पर्धेत गट अ वर्ग 1 ते 4 मध्ये प्रथम क्रमांक रिद्धी राजेंद्र घरोटे, द्वितीय क्रमांक इहा पंकज जोशी, तृतीय क्रमांक शौर्य जी. चवरे यांनी तर गट ब वर्ग 5 ते 8 मध्ये.प्रथम क्रमांक जीविका मनोज हांडे, द्वितीय क्रमांक पार्थ किरण पराते, तृतीय क्रमांक सृष्टी एस प्रजापती यांनी पटकावला आहे. गट क वर्ग 9 ते 12 मध्ये प्रथम क्रमांक जान्हवी संजय बनकर,द्वितीय क्रमांक मृण्मयी ललित मूल्लेवार, तृतीय क्रमांक केतकी महेंद्र किनेकर यांनी प्राप्त केला आहे. गेली तीन वर्षे उन्हाळयाच्या सुटीत संस्कार भारती चंद्रपूर तर्फे चंद्रपूरच्या आझाद बागेत रेषारंग हा चित्रकला प्रशिक्षणाचा उपक्रम नि:शुल्क राबविण्यात येत आहे. चित्रकला विधा प्रमुख किरण पराते आणि रांगोळी विधा प्रमुख सुहास दुधलकर यांनी रेषारंग या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

यावर्षी या उपक्रमाचा समारोप चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण कार्तिक नंदुरकर, संजय अंड्रस्कर, किरण कत्रोजवार या तज्ञ चित्रकला शिक्षकांनी केले.या स्पर्धेतील विजेत्यांना दि. 20 जुलै रोजी स्थानिक न्यु इंडिया कॉन्व्हेंट गुरुद्वारा जवळ तुकूम चंद्रपूर येथे आयोजित गुरुसन्मान सोहळ्यात पारितोषिके प्रदान करण्यात येतील असे संस्कार भारती चंद्रपूर तर्फे कळविण्यात आले आहे.