जाळपोळ करणारे गुन्हेगार जेरबंद ब्रम्हपुरी पोलीसांची कारवाई
फिर्यादी नामे विष्णू खुशाल घोरमोडे वय-२५ वर्षे, व्यवसाय- हॉटेल व पानठेला चालविणे, जात- कुणबी, रा. पारडगांव, ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर. यांनी पो.स्टे. ला येवून तोंडी रिपोर्ट दिली की, ब्रम्हपुरी ते आरमोरी हायवे रोड वरील पारडगांव फाट्यावर त्याचा विष्णू पान सेंटर नावाचा पानठेला व हॉटेल आहे. दिनांक २६/०६/२०२५. रोजीचे रात्री ०९.०० वा. ते दिनांक २७/०६/२०२५ चे ०२.३० वा. चे सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने त्याचे पानठेल्याला आग लावून पानठेल्यात ठेवलेला सामान जाळून नुकसान केले आहे. अज्ञात इसमावर कार्यवाही होणेबाबत त्याने पोलीस स्टेशनला तोंडी तकार दिल्याने त्यावरुन पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अप.क. २७८/२०२५ कलम ३२६ (g) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये दिनांक २७/०६/२०२५ चे १०.२२ वा. गुन्हा नोंद करण्यात आला.
मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन दिनांक ११/०७/२०२५ रोजी मौजा पारडगांव येथील नामे १) निलेश अनिल ढोरे वय-२१ वर्षे, धंदा-मजुरी, रा. पारडगांव, ता. ब्रम्हपुरी २) विनय चंद्रगुप्त मेश्राम वय-२८ वर्षे, धंदा-मजुरी, रा. पारडगांव, ता. ब्रम्हपुरी यांना ताब्यात घेवून विचारपुस करण्यात आली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान नोंदविण्यात आलेल्या साक्षदाराचे बयान व तपासात नमुद आरोपीने गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी चंद्रपूर कारागृहात करण्यात आली आहे.
यातील आरोपी कमांक १) याने सदर गुन्हयाचे तपासात त्याने पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील दाखल अपराध क्रमांक ५६१/२०२४ कलम ३२६(g) भारतीय न्याय संहिता हा गुन्हा देखील केल्याची कबुली दिली आहे. अशाप्रकारे ब्रम्हपुरी पोलीसांना जाळपोळीचे दोन गुन्हे उघड करण्यात यश आलेले आहे.
सदर गुन्हयाची गंभीरता पाहुन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री मुम्मका सुदर्शन, भा.पो.से., श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. प्रमोद बानबले, पोलीस निरीक्षक पो.स्टे. ब्रम्हपुरी यांचे देखरेख व नियंत्रणाखाली ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथील श्री. मनोज खडसे, सहायक पोलीस निरीक्षक, रेखलाल गौतम, पोलीस उपनिरीक्षक, डी.बी. पथकचे अंमलदार पो.हवा. योगेश शिवणकर, अजय कटाईत, मुकेश गजबे पो.अ. स्वप्नील पळसपगार, निलेश तुमसरे, चंदू कुळसंगे, प्रमोद सावसाकडे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास रेखलाल गौतम, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. ब्रम्हपुरी हे करीत आहेत.









