अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करुन तो व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल करणाऱ्यां ३ आरोपींविरुद्ध पोलीसांनी केले गुन्हा दाखल.
आज दिनांक ११ जुलै, २०२५ रोजी दुपारी १:३० ते २:०० वाजता दरम्यान पिडीत मुलगी आणि त्याचे वडील पोलीस स्टेशन शेगांव येथे येवुन तक्रार दिली की, दिनांक २४ मे, २०२५ रोजी आरोपीने तिचे सोबत अत्याचार करुन सदर अत्याचाराचे व्हिडीओ तयार करुन सोशल मिडीयावर वायरल केले आहे. यावरुन सदर तक्रारीची शेगांव पोलीसांनी तात्काळ दखल घेवुन यातील तीन आरोपी निष्पन्न करुन ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस स्टेशन शेगांव येथे सदर प्रकरणी संबंधीत आरोपीताविरुध्द कलम ७० (२), १२३, भारतीय न्याय संहिता-२०२३ सहकलम ४, ६ पोक्सो कायदा, सहकलम ६६ (ई) ६७(अ) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्हयाचे गांभीर्य पाहता सदर गुन्हयात वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली असुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राकेश जाधव, उपविभागीय चिमुर हे स्वतः करीत आहे.
तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारचा फोटो / व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत करु नये व पोलीसांना सहकार्य करावे. अशा प्रकारच्या फोटो/व्हिडीओ प्रसारीत केल्यास संबंधीतांविरुध्द सुध्दा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.