अवैध देशी-विदेशी दारु वाहतुक करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई

अवैध देशी-विदेशी दारु वाहतुक करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी

दिनांक ०१ जुलै, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्दीत अवैध धंदे विरुध्द कारवाईची पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर कडुन मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन कळमना गावाजवळ नाकाबंदी करून एक महिन्द्रा स्कॉपिओ वाहन क. MH34-CJ-6576 ला थांबवून पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैध रित्या देशी विदेशी दारु साठा मिळुन आला. तसेच सदर गुन्हयात पायलटींग करीता वापरलेला वाहन टाटा अल्ट्रोझ क. MH34-CJ-7337 चा चालक सदर वाहन सोडुन पळुन गेला. यावरुन सदर प्रकरणी पो.स्टे. बल्लारपूर येथे अपराध क्रमांक ४६२/२०२५ कलम ६५ (अ), ८५ महाराष्ट्र दारुबंदी कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर गुन्हयात आरोपी नामे नितीन राजन कुंडे वय ३५ वर्ष रा. राजेंद्रप्रसाद वार्ड बल्लारपूर यास अटक करुन त्याचे ताब्यातील वाहनामधील अवैध दारु साठा (१) देशी दारु रॉकेट संत्रा 90 ml च्या ३८०० नग निपा किं. १,३३,०००/- रु. (२) बिअर haywards 5000 500 ml च्या ७२ टिन किं. ९३६०/- रु. (३) विदेशी दारु Imperial Blue 180ml च्या ४८ नग निपा किं.८१६०/- रु. (४) महिन्द्रा स्कॉंपिओ वाहन क्र. MH34-CJ-6576 किं. १५,००,०००/- रु. (५) टाटा अल्ट्रोझ क. MH34-CJ-7337 किं.७,००,०००/- रु. असा एकुण २३,५०,५२०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पाहीजे असलेला आरोपी नामे सिध्दार्थ उर्फ बापु भास्कर रंगारी रा. कारवा रोड, रविंद्रनगर वार्ड बल्लारपूर याचा शोध घेणे सुरु आहे. गुन्हयाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कॉक्रेडवार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा किशोर वैरागडे, अजय बागेसर, प्रमोद कोटनाके, पोअं शेखर माथनकर, गोपीनाथ नरोटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.