तलवार घेवुन दहशत निर्माण करणारे युवकास अटक // स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कारवाई

तलवार घेवुन दहशत निर्माण करणारे युवकास अटक

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कारवाई

दिनांक २५ जुन, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना यातील आरोपी नामे विक्रमसिंग सबजीतसिंग टाक वय २१ वर्ष रा. जुनोना चौक, बाबुपेठ चंद्रपूर हा महाकाली मंदीर जवळील हनी बार अॅण्ड रेस्टॉरंट समोर हातात तलवार घेवुन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असतांना मिळुन आल्याने त्यास शिताफीने पकडुन त्याचेविरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक ४३९/२०२५ कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजीनकांत पुटटेवार, पोअं प्रशांत नागोसे, इमरान खान, किशोर, सुमित बरडे, शेखर माथनकरउ सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.