छायाचित्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार व बीडिओना निवेदन
तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायत व्ही .एल. इ. ऑपरेटर तथा ग्रामसेतू महाऑनलाईन ऑपरेटर हे शासकीय यंत्रणा व साहित्याचे अवैध वापर करून घरकुल योजना, शौचालयाचे फोटो तसेच पासपोर्ट साईज फोटो काढण्याचे कामे अवैधरित्या करत आहेत, त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील फोटोग्राफी व्यवसायिकांना उपासमारीची वेळ आलेली आहे. व्ही.एल.ई. आपरेटर तथा ग्रामसेतू महाऑनलाईन आपरेटर यांच्या शासकीय यंत्रणा(कॉम्प्युटर) प्रिंटर,रूम आणि विजेचा वापर व साहित्याचे अवैध्य वापरावर बंदी करण्यात यावी.तसेच सिंदेवाही तालुका ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक फोटोग्राफरला प्राधान्य देण्यात यावे अनेक फोटो स्टुडिओ धारकांनी विविध बँकेचे कर्ज उचलून लाखोंचे कॅमेरे घेऊन फोटोग्राफी व्यवसाय सुरू केला आहे, त्यामुळे त्यांचे कर्जाचे हप्ते सुद्धा चुकत आहेत, ग्रामपंचायत ऑपरेटरमुळे तालुक्यातील फोटोग्राफी व्यवसायिकांना उपासमारीची वेळ आलेली आहे. सिंदेवाही तालुक्यातील फोटोग्राफी व्यवसायिकांचा विचार करून सर्व ग्रामपंचायतींना व्यावसायिक फोटोग्राफर करून फोटो काढण्याचे आदेश देण्याकरिता छायाचित्रकार संघटना सिंदेवाही तर्फे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हा छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष फुलचंद मेश्राम संस्थापक अध्यक्ष नितीन रायपुरे ,सचिव वासू वाकडे ,अमोल भाऊ मेश्राम तथा, सिंदेवाही तालुकाध्यक्ष दिनेश गोवर्धन, उपाध्यक्ष धनेश वंजारी, सचिव प्रकाश चिंतलवार, कोषाध्यक्ष सुभाष बनसोड, सुभाष मधु मेश्राम, जितेंद्र मेश्राम, पुरुषोत्तम मंदाळे, नागेश सोयाम,संतोष समृतवार, समीर वासनिक, गोकुल रामटेके,मंगेश सदनपवार व सिंदेवाही तालुक्यातील सर्व फोटोग्राफर यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले.