सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

विद्या प्रसारक संस्था संचालित सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे थोर समाजसुधारक व दूरदृष्टीचे राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशील कुंजलवार यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेसाठी व शिक्षणाच्या प्रसारासाठी दिलेल्या भरीव योगदानावर प्रकाश टाकला.

आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. सुशील कुंजलवार म्हणाले, “छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने समाजसुधारणेचे प्रणेते होते. मागासवर्गीयांसाठी शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी समतेच्या दिशेने भक्कम पाऊल उचलले. त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याबरोबरच सामाजिक समतेच्या मूल्यांना जपण्याची आपली जबाबदारी अधोरेखित करणे होय.”

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले असून, सर्व उपस्थितांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी डॉ. राजेश डहारे, डॉ. सिद्धार्थ मदारे, डॉ. रिजवान शेख, प्रा. अमित उके, प्रा. तुकाराम बोरकर, प्रा. चेतना अगडे, प्रा. अपर्णा कोवे, पत्रकार प्रविण नागदेवते, सीएचबी सुनील गभणे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.