‘छोटूभाई पटेल हायस्कूल शाळेमध्ये ‘शाळेचा पहिला दिवस गोड दिवस ‘
माजी विद्यार्थी संघाचा सलग दुसऱ्या वर्षी अभिनव उपक्रम
चंद्रपूरच्या छोटूभाई पटेल हायस्कूलमधील माजी विद्यार्थी संघातर्फे ‘छोटूभाई पटेल हायस्कूल मध्ये सलग दुसऱ्या वर्षी ‘शाळेचा पहिला दिवस गोड दिवस ‘हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
शाळेचा पहिला दिवस हा शाळेत येणाऱ्या प्रत्येक नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असाच ठरावा त्यादृष्टीनेच माजी विद्यार्थ्यांतर्फे या खास दिवसाचे आयोजन करण्यात येते. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंनर गोड पदार्थ वाटून शाळेच्या पहिल्या दिवसाची गोड सुरुवात करण्यात आली.
या दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये नोटबुकचे वाटप करून उपक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.या उपक्रमादरम्यान धीरज साळुंके यांनी शाळेवर लिहिलेल्या कविताद्वारे उपस्थितांची मने जिंकली.
शाळेचे संचालक जितेनभाई ( लोटी ) पटेल यांचे मार्गदर्शन तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
उपक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकांत कोतपल्लीवार, प्रफुल्ल देमेवार, सागर कुंदोजवार, मंगला अडबाले, धीरज साळुंके, वीणा खोब्रागडे, पराग जवळे, श्याम कोंतंमवार, आशिष धर्मपुरीवार, जितेंद्र मशारकर आदींनी मेहनत घेतली तर छोटूभाई पटेल हायस्कूल मधील माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघातर्फे मागील वर्षीपासून सुरु झालेला ‘शाळेचा पहिला दिवस ” हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून अश्या उपक्रमामुळे माजी विद्यार्थ्यांमध्ये नवचैत्यनं निर्माण झालं आहे. अश्या नवनवीन उपक्रमामुळे विध्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारतो आणि शिक्षणाची गोडी निर्माण होते असल्याचे मत आमदार , राजुरा विधानसभा क्षेत्र तथा छोटूभाई पटेल हायस्कूल चंद्रपूरचे माजी विद्यार्थी देवराव भोंगळे यांनी म्हटले आहे.
छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघ बॅच 1999 तर्फे मागील वर्षी पासून सुरु झालेला “शाळेचा पहिला दिवस गोड दिवस” या अभिनव उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे आज शब्द कमी पडत आहेत. अश्या प्रकारचा उपक्रम या अगोदर कोणत्याही शाळेत झालेला नाही. अश्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरवात छोटूभाई पटेल हायस्कूल शाळे पासून झाली हि गोष्ट माझ्यासाठी तसेच शाळेतील समस्त शिक्षकवृंदासाठी खरंच खूप अभिमानास्पद आहे. या उपक्रमाला भविष्यात आणखी बळ मिळो तसेच या संघाचा प्रवास असाच अविरतपणे सुरु राहावा असे मत छोटूभाई पटेल हायस्कूल चंद्रपूरचे संचालक जितेनभाई (लोटी) पटेल यांनी म्हटले आहे.