नागभीड जंगल परिसरात ५२ ताश पत्त्यांवर जुगार खेळणारे विरुध्द गुन्हा नोंद स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कारवाई
दिनांक १४ जुन, २०२५ रोजी पो.स्टे. नागभीड हद्दीतील बोंड राजोली जंगल परिसरात काही इसम ५२ ताश पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे खात्रीशिर माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने रेड केली असता काही इसम मोटार सायकल ठेवुन पळुन गेले व २ इसम मिळुन आल्याने त्यांची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता अंगझडतीत व डावावर रोख २७,८००/- रु. दोन नग मोबाईल आणि एकुण ०६ नग मोटार सायकल असा एकुण ३,४८,४००/- रुपयाचा माल मिळुन आल्याने आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन नागभीड येथे अपराध क्रमांक १८८/२०२५ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री बलराम झाडोकर, पोउपनि श्री विनोद भुरले, प्रो. पोउपनि श्रीनाथ गिराम, श्री भुषण पाटील, सफौ धनराज करकाडे, पोअं. सुरेंद्र महंतो, दिनेश अराडे, गजानन मडावी, प्रशांत नागोसे, प्रफुल्ल गारघाटे, शेशांक बदामवार, किशोर वाकाटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.








