स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी,प्रतिबंधीत अवैध सुगंधित तंबाखू जप्त
दोन आरोपींना अटक, मोठे तस्कर मोकाट..
आज दिनांक 13/06/2025 रोजी सटकर साहेब अन्न सुरक्षा अधिकारी चंद्रपूर यांनी श्रीकृष्ण ट्रेडर्स एकता चौक यांचे दुकानात दोन पंचा समक्ष झडती घेतली असता दुकानात एकूण 15200 रु अवैध सुगंधित तंबाखू मिळून आल्याने जप्तीची कार्यवाही करण्यात आली. पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे फिर्याद दिल्या वरून गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यातलायत हजर करण्यात आले.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे नेतृत्वात करण्यात आली असून उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांचा मार्गदर्शनात पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय राठोड करीत आहेत
सिंदेवाही तालुक्यात अवैध सुगंधीत तंबाखू मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे, आणि हे काम काही विशेष मोठ्या तस्कराकंडुन केले जात आहे, परंतु मोठे तस्कर पोलीसांच्या जाळ्याला लागले नाहीत.