नागपूरच्या अंडर-१४ मुलं व मुलींच्या संघाची महाराष्ट्र राज्य रग्बी स्पर्धा २०२५ मध्ये सहभागासाठी तयार.

नागपूरच्या अंडर-१४ मुलं व मुलींच्या संघाची महाराष्ट्र राज्य रग्बी स्पर्धा २०२५ मध्ये सहभागासाठी तयार.

            रग्बी असोसिएशन ऑफ नागपूर यांचा अंडर-१४ मुलं व मुलींचा संघ ३१ मे २०२५ रोजी शिव छत्रपती क्रीडा संकुलबालेवाडीपुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य रग्बी स्पर्धा २०२५ मध्ये नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

            मागील वर्षी पार पडलेल्या शालेय राज्य रग्बी स्पर्धा २०२४ मध्ये नागपूरच्या अंडर-१४ मुलांच्या संघाने कांस्य पदक जिंकले होते, तर मुलींच्या संघाने ८वा क्रमांक पटकावला होता. या वर्षी दोन्ही संघ अधिक चांगल्या प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत.

            या संघांतील बहुतांश खेळाडू हे नागपूर जिल्ह्यातील डोंगरतालदेवळापार व कामठी यासारख्या आदिवासी व ग्रामीण भागांतील आहेत, हे विशेष अभिमानास्पद आहे. ही मुले आपल्या मेहनतीने व कौशल्याने राज्यस्तरावर पोहोचली आहेत.

अंडर-१४ मुले संघ:अंडर-१४ मुली संघ:
१. सुशांत धर्मराज डोडके – कर्णधार

२. अभय पंथाम इनवते

३. चेतन ईश्वर मलघामा 

४. स्पर्श राकेश गोळे

५. अर्शद खान अयुब खान पठाण

६. प्रज्वल प्रकाश बादशाह

७. द्रुप कैलास कुंभारे

८. समर्थ मनोज गायकवाड

९. महेंद्र जनार्धन घरत

१०. नक्श नफीस शेख

प्रशिक्षक: अमर भंडारवार व अजय सांधेकर.

१. श्रुमती ईश्वर मलघाम – कर्णधार

२. तन्वी महेंद्र वाडीवे

३. वंशिका धर्मराज डोडके

४. युनिक विजय सांधेकर

५. अलीना अब्दुल शेख

६. आलिया अब्दुल शेख

७. आरुषी रुपेश सांधेकर

८. उर्वशी मोरेश्वर कोडवाते 

प्रशिक्षक: अजय सांधेकर व अमर भंडारवार.

         रग्बी असोसिएशन ऑफ नागपूर चे सर्व पदाधिकारी, खेळाडूंना शुभेच्छा देत असून आशा करीत आहेत की या वर्षी दोन्ही संघांकडून अधिक पदके मिळवून नागपूरचे नाव उज्ज्वल होतील.