घुग्गुस येथे गोळीबार झाले नसल्याचा तज्ञांचा अहवाल प्राप्त
दिनांक ९ मार्च, २०२५ रोजी पोलीस स्टेशन घुग्घुस हद्दीतील श्री राजु रेड्डी यांचे घरातील पहिल्या मजल्यावर किरायाने राहत असलेले श्री अनुपसिंग चंदेल यांच्या पोर्च मध्ये मिळुन आलेल्या काडतुसच्या समोरील रिकामा केस संदर्भात पोलीस स्टेशन घुग्घुस येथे अपराध क्रमांक ४४/२०२५ कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात येवुन सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक टिम, बीडीडीएस पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके, श्वान पथक, आरमोरर पथक यांनी भेट देवुन प्राथमिक चौकशी केली असता त्यात सदर ठिकाणी गोळीबार झाल्याचे काही चिन्ह दिसुन आले नव्हते.
तरी, फॉरेन्सिक पुष्टी करीता सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान घटनास्थळी बॅलेस्टीक तज्ञांना बोलाविण्यात येवुन सदर ठिकाणी मिळुन आलेली काडतुसाची रिकामे केस ई. फॉरेन्सिक तपासणी करीता पाठवुन तज्ञांचा अहवाल मागविण्यात आला असता उपसंचालक, प्रादेशिक न्यायवैद्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, नागपूर यांचे कडील अहवाल प्राप्त झाला असुन अहवालात सदर ठिकाणी गोळीबार झाला नसल्याचा स्पष्ट अभिप्राय दिलेला आहे.
त्याचप्रमाणे सदर गुन्हयाचा आजपावेतोच्या सखोल तपासात सुध्दा सदर ठिकाणी गोळीबार झाल्याचे निष्पन्न झालेले नाही.








