चंद्रपूर मनपास मिळाले ३ नवीन पाणी टँकर आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण
चंद्रपूर 22 मे – स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या 3 पाणी टँकरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते फीत कापुन लोकार्पण आज करण्यात आले.
या 3 टँकर पैकी 1 टँकर 1 हजार लिटर क्षमतेचा असुन उर्वरीत 2 हे 4 हजार लिटर क्षमतेचे आहेत. पाणीपुरवठा करण्यास मनपाचे स्वतःचे 8 टँकर असुन ता 3 टँकरची भर पडल्याने मनपाकडे एकुण 11 टँकर पाणी पुरवठा करण्यास सज्ज झाले आहेत. पाण्याची टंचाई बघता 6 खाजगी टँकरने सुद्धा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सदर खरेदी करण्यास स्थानिक आमदार विकास निधीतुन आमदार किशोर जोरगेवार यांनी निधी उपलब्ध करून दिला होता.
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत मोठया प्रमाणात वाढ होत असते. सातत्याने वाढणारे उष्णतामानाने पिण्याच्या पाण्यासह उकाडा घालविण्यास कुलर सारख्या गोष्टींचा दैनंदिन वापर केला जातो. अशा परिस्थितीत शहरवासीयांकडून पाण्याच्या वापरात लक्षणीय वाढ होते. वाढीव मागणीचा विचार करता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे वाढीव स्वरूपात पाणीपुरवठा केला जातो.
या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिद्रावार, शहर अभियंता रवींद्र हजारे,उपअभियंता रवींद्र कळंबे,चैतन्य चोरे,माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार,देवानंद वाढई तसेच मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.