महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही दहावी परीक्षेचा निकाल ८०.८५%
फुले सामाजिक व सांस्कृतिक शिक्षण मंडळ सिंदेवाही द्वारा संचालित महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८०.८५% इतका लागला.विद्यालयातून प्रथम श्रेयस किशोर पिसे हा आला त्याला ९२.६०% मिळाले तर द्वितीय संचित रूपेश पोपटे हा आला त्याला ८१.६०% मिळाले. तृतीय कु. समीक्षा नंदू मोहुर्ले ही आली तिला ८०.४०%मिळाले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे.गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देण्यात आले.संस्थेचे संस्थापक माननीय नरेंद्र ढोले साहेब व इतर संचालक यांनी सर्व गुणवंताचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.